रावेरसह बोदवडला रेल्वे गाड्यांना थांबे द्या : रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मंत्री रक्षा खडसे यांची मागणी
Allow halts for trains at Raver and Bodwad : Minister Raksha Khadse’s demand to the Railway Board Chairman रावेर (4 जून 2025) : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखील खडसे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेरसह स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. या बैठकीत रावेरसह बोदवड स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दखल घेण्याचे आश्वासन
नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12656) ला बोदवड स्थानकावर थांबा देण्यात यावा तसेच दानापूर- पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 12150) व महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. 22177) ला रावेर स्थानकावर थांब उदेण्याची मागणी करण्यात आली. रावेर येथे या गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.