भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
Tree planting on World Environment Day at Dadasaheb Devidas Namdev Bhole College, Bhusawal भुसावळ (5 जून 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.गोविंद वाघुळदे, प्रा.मनोज पाटील उपस्थित होते.
पर्यावरणाचे महत्व जपायला हवे
प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विषद केले. हा दिवस पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवतो आणि लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे महत्त्व कशा प्रकारे जपले पाहिजे याबद्दल त्यांनी माहिती दिली. हा दिवस लोकांना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस लोकांना पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रेरित करतो. 2025 यावर्षीचा विषय ‘प्लास्टिक प्रदूषण थांबवू’ असून ज्यामध्ये प्लास्टिक कचर्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत केले असून प्लास्टिकचा वापर कमी करा, पाण्याचा योग्य वापर करा, ऊर्जा वाचवा, झाडे लावा, कचरा व्यवस्थापन करा, असे आवाहन प्राचार्यांनी केले. प्रसंगी सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी यांनी सहकार्य केल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.