भुसावळातील तिघा विक्रेत्यांवर पालिकेच्या पथकाची कारवाई
कॅरीबॅग बाळगणे भोवले ; 15 हजारांचा दंड वसुल
भुसावळ : प्लॅस्टीक बंदी असतानाही दुकानात सर्रासपणे प्लॅस्टीक कॅरीबॅग वापरणार्या तिघा व्यावसायीकांविरुद्ध भुसावळ पालिकेच्या पथकाने गुरुवारी कारवाई केल्याने खळबळ उडाली. भुसावळ पालिकेच्या विशेष पथकाने शहरातील नसरवांजी फाईल भागातील न्यू डिसुझा बेकरी चालकासह बाजार वॉर्डातील मुंजोबा साडी सेंटरसह शहरातील अमर किराणा सेंटरमधून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त करीत संबंधित दुकानदारांना प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे एकूण 15 हजारांचा दंड वसुल केला.
यांनी केली कारवाई
मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने विशेष पथक नियुक्त केले असून या पथकात प्रभारी आरोग्याधिकारी निवृत्ती पुरूषोत्तम पाटील, आरोग्य निरीक्षक वसंत राठोड, प्रदीप पवार, लिपिक संजय सुरवाडे, पोपट संसारे, सतीश बेदरकर, राजू टाक,
धर्मेंद्र खरारे यांचा सहभाग होता.