भुसावळातील प्रभाग सातमध्ये 52 बांधकाम कामगारांना भांड्यांचा संचाचा लाभ
माजी नगरसेवक सतीश सपकाळे व अनिता सपकाळे यांच्या प्रयत्नातून उपक्रम
भुसावळ (5 जून 2025) :शहरातील प्रभाग क्रमांक सातचे उपक्रमशील माजी नगरसेवक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे व माजी नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील 52 बांधकाम कामगारांना भांडी संचाचा लाभ देण्यात आला. भाजपाचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, 5 जून रोजी हा उपक्रम राबवण्यात आला.
कामगारांना मिळवून द्यावा लाभ
कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की, शासनातर्फे महिलांच्या विकासासाठी लाडकी बहिण योजना, फ्री शिलाई मशीन त्याचबरोबर गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने महाराष्ट्रामधील बांधकाम कामगारासाठी सरकारने मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे, पात्र लाभार्थींना या योजनेंतर्गत लाभ मिळवून दिला जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी सर्व कामगारांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी यावेळी केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष सतीष सपकाळे, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, प्रतिभा पाटील, मीना लोणारी, माजी नगरसेवक मुकेश पाटील, अॅड.बोधराज चौधरी, प्रीती पाटील, प्रा.सीमा पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोंदणी अंती कामगारांना मिळाला लाभ
माजी नगरसेविका अनिता सपकाळे तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सतीष सपकाळे यांच्यातर्फे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळात भांडे संच मिळण्यासाठी नोंदणी करून घेण्यात आली.
दलालांपासून सावधान रहा
शासनाने सर्व योजना नागरीकांपर्यंत मोफत पोहोचवण्याची उपाययोजना केली आहे. कामगारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नाही, त्यामुळे पैसे घेणार्या दलालांपासून सावध रहावे, असे आवाहन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले.
शासनाच्या सर्व योजनाचा लाभ नागरिकांना मिळवून देणार
कामगारांची केवायसी कार्यालयात सुरू आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्यात येईल, असे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे म्हणाले.
