उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगरात : मुक्ताई पालखी सोहळ्याला लावणार हजेरी

Deputy Chief Minister Eknath Shinde in Muktainagar today : Will attend the Muktai palanquin ceremony जळगाव (6 जून 2025) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार, 6 जून 2025 रोजी मुक्ताईनगर दौर्यावर येत असून मुक्ताई पालखी सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत.
शुक्रवार, 6 जून 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील व तीन वाजता पुणे विमानतळावरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण केल्यानंतर दुपारी 03.45 वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल व तेथून मोटारीने मुक्ताईनगरात ते दुपारी साडेचार वाजता कोथळीतील आदिशक्ती मुक्ताई मंदिरात आदिशक्ती मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती देतील.