ज्येष्ठ नागरिकांची कामाची हातोटी पाहून आश्चर्य वाटते : रजनी सावकारे
भुसावळ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहाचे लोकार्पण
It is surprising to see the work skills of senior citizens : Rajani Savkare भुसावळ (11 जून 2025) : आज ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या नवीन सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास येण्याचा योग आला हे फार बरे वाटले, येथे आल्यावर ज्येष्ठ नागरिकांची कामाची हातोटी पाहून खुपच आश्चर्य वाटले, सर्वच ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत उत्साहाने कामे करीत आहे. यामुळे हा आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या नवीन सभागृहाचा उपयोग विविध उपक्रमांसाठी होणार आहे, यातून आजच्या युवकांना चांगली शिकवण द्यावी, असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले.
श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे नव्याने बांधलेल्या ज्येष्ठ नागरिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच रजनी सावकारे यांच्याहस्ते लोकार्पण करून पार पडला. या सभागृहाचे निर्माण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या आमदार निधीतून झाले आहे. हा सोहळा शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी,भाजप अध्यक्ष किरण कोलते, संदीप सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. बापू महाजन, सोनल महाजन आदी उपस्थित होते. यावेळी श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश विसपुते यांनी प्रास्तावीत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.