रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : उद्या ईगतपुरी मेमू रद्द : या गाड्या धावणार विलंंबाने

Railway passengers, pay attention : Igatpuri MEMU cancelled tomorrow: These trains will run with delays भुसावळ (11 जून 2025) : भुसावळ विभागातील माहेजी येथे यार्ड रीमॉडेलिंगसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कार्य गुरुवार, 12 रोजी करण्यात येणार असून त्यामुळे गाड्यांच्या सेवेवरही परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू व 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द केली असून तीन गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात येणार असून दोन गाड्या विलंबाने धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
तीन गाड्या विविध ठिकाणी थांबणार
12741 वास्को-दी-गामा-पटना एक्सप्रेस गाडी सुमारे 1.30 तास, 12171 एलटीटी-हरिद्वार ही गाडी सुमारे 45 मिनिटे तर 05558 एलटीटी-रक्सौल एक्स्प्रेस सुमारे 45 मिनिटे नियंत्रित करण्यात येईल शिवाय 12165 एलटीटी- गोरखपूर (एक्स्प्रेस) सहा ऐवजी 7.45 वाजता अर्थात 1.45 तास उशिराने सुटेल. 15017 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस प्रस्थान स्टेशन येथून 06.35 वाजता ऐवजी 07.35 वाजता सुटेल एक तास उशिराने सुटणार आहे. हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाली व संरक्षक दृष्टीने आवश्यक आहेत. प्रवाशांनी होणार्या असुविधेबद्दल सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.