यावल येथे स्लॅबची बांधणी करताना विद्युत शॉक लागून दोन गंभीर


Two seriously injured after getting electrocuted while constructing slab in Yaval यावल (12 जून 2025) : यावल शहरातील बाबानगर भागात औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या जवळ स्लॅबसाठी लोखंडी आसारीची बांधणी करत असताना 33 केव्हीए उच्च विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दोघांना विद्युत शॉक लागला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून दोघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

काय घडले यावल शहरात
शहरात चोपडा रस्त्यावर बाबा नगरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ शेख कलीम शेख खलील यांच्या घराच्या स्लॅपसाठी लोखंडी आसारी बांधणी सुरू होती. दरम्यान आसारी बांधत असताना रफीउद्दिन अन्सारोद्दीन (27, रा.बाबूजीपुरा, यावल) व शेख कलीम शेख खलील (30, रा.बाबा नगर) या दोघांना घराजवळून जाणार्‍या 33 केव्हीए उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाला. यात त्यांना जबर विद्युत धक्का बसला. यामध्ये रफियोदिन हा तरुण शरीराच्या उजव्या बाजूने पूर्णपणे भाजला गेला तर शेख कलीम यांच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.


ग्रामीण रुग्णालयात डॉ.ऋषभ पाटील, अधिपरिचारिका नेपाली भोळे, सुमन राऊत, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. यातील रफीउद्दिन याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व शेख कलीम या दोघांना तातडीने पुढील उपचारागिरी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !