वादळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी


MLA Mangesh Chavan inspected the damage to agricultural crops caused by stormy rains चाळीसगाव (12 जून 2025) : चाळीसगाव तालुक्यातील बहाळ, टेकवाडे, रहिपुरी, वडगाव लांबे परिसरात वादळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकर्‍यांच्या दुःखात सहभागी होत आज मी स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासनाच्या अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य समजतो. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही यावेळी शेतकर्‍यांना आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !