चोपडा तालुक्यात धाडसी घरफोडी : सव्वा सात लाखांचा मुद्देमाल लंपास

Bold house burglary in Chopra taluka : Property worth seven and a half lakhs looted चोपडा (13 जून 2025) : चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथून चोरट्यांनी घरातून 7.9 तोळे सोने व 20 हजार रुपये रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार समोर आला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
धाडसी घरफोडीने खळबळ
कुसुंबा गावात मंगळवार, 10 जून रोजी रात्री 8 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान तुषार शामकांत पाटील यांच्या घरातील मागच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील 7.9 तोळे सोने व सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम असे 7 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तुषार शामकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल सुनील कोळी, विनोद पवार स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील यांनी भेट दिली. श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक व फिंगर प्रिंटचे पथक यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला.
