चोपडा तालुक्यात धाडसी घरफोडी : सव्वा सात लाखांचा मुद्देमाल लंपास
Bold house burglary in Chopra taluka : Property worth seven and a half lakhs looted चोपडा (13 जून 2025) : चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथून चोरट्यांनी घरातून 7.9 तोळे सोने व 20 हजार रुपये रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार समोर आला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
धाडसी घरफोडीने खळबळ
कुसुंबा गावात मंगळवार, 10 जून रोजी रात्री 8 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान तुषार शामकांत पाटील यांच्या घरातील मागच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील 7.9 तोळे सोने व सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम असे 7 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तुषार शामकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.








