भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली


भुसावळ (13 जून 2025) : अहमदाबादहून लंडनसाठी जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी अवघ्या काही मिनिटात कोसळल्याने विमानातील 241 तर मेघाली नगर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे 24 मिळून एकूण 265 नागरिकांचा मृत्यू ओढवला होता. या दुर्घटनेत 60 वर अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले असून दुर्घटनेतील मृतांना शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेत श्रद्धांजली वाहिली. अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी शाळेत सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर, व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर, श्रध्दाली घुले, गौरी प्रभू देसाई, गायत्री घीर्णीकर, सोफिया पीबॉडी, पंकज राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !