भुसावळ पालिका निवडणूक : मतदार याद्या अद्यावत करण्याच्या सूचना

प्रांताधिकारी कार्यालयात अर्चना मोरे यांनी घेतली आढावा बैठक


Bhusawal Municipal Election: Instructions for updating voter lists भुसावळ (13 जून 2025) : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिसूचना जाहीर केली असून त्यानुसार राज्यभरात निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून, भुसावळ येथील उपविभागीय कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात निवडणूकीशी संबंधिक महसूल कर्मचारी, बीएलओ यांची उपस्थिती होती. मतदार याद्या अद्यावत करण्यावर सर्वांनी अधीक भर द्यावा, अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शासकीय यंत्रणा सुध्दा कामाला लागली आहे.

विविध विषयांवर चर्चा
प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी 12 वाजता आयोजित या बैठकीत भुसावळ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित आणि विवाहित महिलांची नोंदणी व वगळणी, तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भुसावळ तालुक्यात एकूण 314 बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) कार्यरत असून, त्यापैकी बहुतांश अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी जितेद्र पाटील यांनी सुध्दा कामाच्या दृष्टीने सूचना केल्यात. या बैठकीला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, के.ए.तडवी तसेच अन्य निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि वेळेचे पालन यावर भर देण्यात आला. संबंधित कर्मचार्‍यांना त्यांच्या जबाबदार्‍या काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अश्या दिल्या सूचना
1 जुलै 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण करणार्‍या युवक-युवतींची नावनोंदणी करणे, मृत मतदारांची नावे वगळणे, लग्नानंतर इतरत्र स्थलांतरित महिलांची नावे वगळणे, गावात नव्याने आलेल्या विवाहित महिलांची नोंदणी करणे, दुहेरी नोंदणी असलेल्या नावांची छाननी करून एक नोंद वगळणे, सहा महिन्यांहून अधिक काळासाठी स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नमुना 6, 7 आणि 8 चे फॉर्म भरावेत, मतदारसंख्या 1200 पेक्षा अधिक असलेल्या यादी भागांचे विभाजन करून स्वतंत्र बीएलओ यांची नेमणूक करण्यात येईल, मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची माहिती अहवालाद्वारे सादर करणे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !