मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी शशिकांत पाटील
नागेश मोहिते यांची नाशिकमध्ये विनंती बदली : कर्मचार्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप

Shashikant Patil appointed as Inspector of Muktai Nagar Police Station मुक्ताईनगर (13 जून 2025) : शिस्तप्रिय व सर्वांना हवाहवासा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील निरीक्षक नागेश मोहिते मोहिते यांची नाशिक येथे विनंतीवरून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्यातून बदलून आलेल्या शशिकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नूतन अधिकार्यांचे स्वागत तर निरीक्षक नागेश मोहिते यांना निरोप देण्यात आला.
नागेश मोहितेंना निरोप देताना कर्मचारी गहिवरले
पोलिस निरीक्षक मोहिते यांना कर्मचार्यांतर्फे निरोप देण्यात आला. पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी प्रभावी कार्यशैलीमुळे अल्प काळात तालुक्यात पोलिस प्रशासनाबद्दल सामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यावरही भर दिला तर अनेक गंभीर गुन्हेदेखील त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आले.

मोहिमते यांच्या बदलीनंतर आयोजित निरोप समारंभात पोलिस कर्मचार्यांनी भावूक शब्दांत त्यांचे कौतुक केले, अनेकांच्या डोळ्यांत
अश्रू तरळले तर निरोपाचा सत्कार स्विकारताना व आठवणींना उजाळा देताना खुद्द मोहिते यांचेही डोळे डबडबले .
शशिकांत पाटील यांनी धूरा सांभाळली
धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्याहून बदलून आलेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे आता मुक्ताईनगरची जवाबदारी आहे. शांत व संयमी असलेले निरीक्षक पाटील यांनी यापूर्वी जळगाव एसीबीच्या पोलिस उपअधीक्षकपदाची धूरा सांभाळली आहे शिवाय धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्यातही त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर जरब बसवली आहे. मुक्ताईनगर तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासोबत सर्वसामान्यांना निश्चितपणे न्याय मिळेल, असे काम करू, असेही ते म्हणाले.
