भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत


भुसावळ (17 जून 2025) : सोमवार, 16 जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी शहरातील के.नारखेडे विद्यालयातील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे भव्य-दिव्य असे स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, संस्थेच्या सर्व शाखांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणारे प्रमुख अतिथी अ‍ॅड.पी.ई.नेमाडे, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, के.एन.सी.टी.आय संस्थेचे संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षिका एस.ए.अडकमोल, एस.पी.पाठक आदी सर्वांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तके देण्यात आली. खाऊचे वाटप सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील व संगणक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी शालेय शिस्त आणि सुयोग्य वर्तन या संदर्भात माननीय मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक सपकाळे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या तसेच संगणक विभागातर्फे वंदना वारके यांच्यातर्फे संगणकाचे महत्व विशद करण्यात आले. या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मकरंद नारखेडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !