20 हजारांची लाच घेताना बँक रिकव्हरी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Bank recovery employee caught by ACB while taking bribe of Rs 20,000 नाशिक (17 जून 2025) : मंडळाधिकार्यांच्या नावाने 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जहीर अहमद इक्बाल मुलानी (30, रा. 1 इ, प्लॉट न.809/8/9, रेहमानिया मशीद जवळ, एकनाथ नगर, केडगाव, ता.जिल्हा अहिल्यानगर) यास अटक करण्यात आली. आरोपी हा बँक रिकव्हरी कर्मचारी आहे.
असे आहे लाच प्रकरण
42 वर्षीय तक्रारदाराला मंडळ अधिकारी कार्यालय भिंगार तहसील यांच्याकडून देण्यात आलेली घर जप्तीच्या नोटीसची तारीख मंडळ अधिकारी कार्यालय येथील मंडळ अधिकारी यांच्याकडून वाढवून देण्याचे मोबदल्यात खाजगी इसम जहीर मुलाणी याने मंडळाधिकारी यांच्या नावे 20 हजारांची लाच 17 रोजी मागितली व तक्रारीअंती सापळा रचून लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या झडतीत मोबाईल जप्त करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्स्वी
पोलिस उपअधीक्षक संतोष पैलकर, हवालदार प्रफुल्ल माळी, दिनेश खैरनार, अविनाश पवार आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
