रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : दोन दुचाकींसह चोरटा जाळ्यात


Big achievement by Raver police : Thief caught with two bikes रावेर (18 जून 2025) : रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणी एकास अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. सुशील सुधाकर तायडे (रसलपूर, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरातील नागझिरी मोहल्यातील शेख अकील शेख कलीम यांची हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 सी.एस.0392त्र ही रावेर-रसलपुर रोडवरील हॉटेल एस टू समोरुन चोरीस गेली होती. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सीसीटिव्ही फुटेज व गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सुशील सुधाकर तायडे (रा.रसलपूर) यास अटक केली.


संशयीताची सखोल चौकशी केली असता त्याचे कडून शेख अकील यांची चोरीस गेलेली मोटार सायकल व हिरो होंडा काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल (क्रमांक एम.पी.68 एम.ई.5954) काढून दिल्या.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात हवालदार सिकंदर तडवी, कल्पेश आमोदकर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकारुद्दीन शेख यांच्या पथकाने केली. तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !