रायगडाच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंकडून अघोरी पूजा : विरोधकांनी साधला निशाणा


Bharat Gogawale’s Aghori Puja for the post of Guardian Minister of Raigad : Opposition targets him रायगड (19 जून 2025) : मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी सुरू असतानाच भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले मांत्रिकासोबत दिसत आहेत. या व्हिडिओद्वारे गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप करण्यात आला.

बाबा भरत शेठ : अघोरी विद्या
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक अघोरी बाबा मंत्रोच्चार करताना दिसत आहे तर भरत गोगावले पूजेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असं कॅप्शन सूरज चव्हाण यांनी या व्हिडीओला दिलं आहे. रायगडचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !