भुसावळचे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला सन्मान
Former Bhusawal corporator Rajendra Awate honored by the District Superintendent of Police भुसावळ (19 जून 2025) : शहरातील गांधी नगर भागात पोलिस चौकी उभारणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून पोलिस प्रशासनाला नेहमीच कामात सहकार्य करणार्या भुसावळचे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचा जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते सहृदय सन्मान करण्यात आला. जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात आवटे यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला तसेच भविष्यातही पोलिस दलाला अशाच पद्धत्तीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा अधीक्षकांनी व्यक्त केली.
गांधी नगरात उभारली पोलिस चौकी
भुसावळातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे हे उपक्रमशील नगरसेवक म्हणून ख्यात आहेत. प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. गांधी नगर भागात अप्रिय घटना टळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी त्यांनी पोलिस चौकी असावी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व निधी मंजूर होताच भव्य चौकी उभारून तिचे लोकार्पण करण्यात आले. या कार्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवटे यांचा सहृदय सन्मान केला. सत्काराने चांगले काम करण्यास अधिक बळ मिळाले असल्याची भावना राजेंद्र आवटे यांनी व्यक्त करीत मंत्री सावकारे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे आभार मानले आहेत.