उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका : म्हणाले, ‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा’

Uddhav Thackeray criticizes Rane : He said, ‘He has the height of a penguin, the gait of a duck and the voice of a chicken’ मुंबई (20 जून 2025) : गुरुवारी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. ‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा’ म्हणत त्यांनी राणेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा’, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंना खोचक टोला लगावला तर डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, जीव केवढा, पार्श्वभूमी काय? वडिलांची पार्श्वभूमी काय? बोलतोय कोणावरती? कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या, असं म्हणत ठाकरेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे.
