अंतर्नादच्या प्रबोधनमालेचे आज प्रथम पुष्प चिनावल माध्यमिक विद्यालयात
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानच्या तीन दिवसीय प्रबोधनमालेचे प्रथम पुष्प चिनावल (ता. रावेर) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता नाशिकचे हास्य कलावंत प्रमोद अंबडकर हे गुंफत आहेत. ‘चाल दोस्ता तुला आपला गाव दाखवतो’ हा त्यांचा विषय आहे. चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर बोरोले अध्यक्षस्थानी, तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ जावळे, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, सरपंच भावना बोरोले हे प्रमुख पाहुणे असतील. स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे.