‘ताप्ती बेसीन’ प्रकल्पाला गती दिल्याबद्दल केळीचे सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांप्रती आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता


MLA Amol Javale expressed his gratitude to the Chief Minister by presenting him with a banana award for accelerating the ‘Tapti Basin’ project भुसावळ (21 जून 2025) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी धरणगावात आले होते. यावेळी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत जिल्ह्यातील जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीश  महाजन यांच्या दूरदृष्टीतून ‘बनाना बेल्ट’च्या सर्वांगीण विकासाला चालना देणार्‍या ‘ताप्ती बेसीन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या’ महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारदरम्यानच्या ऐतिहासिक कराराला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे रावेर, यावल, भुसावळ तालुक्यांतील सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढून कृषी उत्पादनात भर घालण्यास मदत होणार आहे. तसेच जलसंधारणाच्या दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जिल्ह्याची कृषी परंपरा आणि ’बनाना बेल्ट’ची ओळख अधोरेखित करणारे ‘केळीचे प्रतीकात्मक सन्मानचिन्ह’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय  सावकारे, धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, अमळनेर आमदार अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !