धक्कादायक : दहा हजारांची लाच घेताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Group development officer caught by ACB while taking bribe of Rs. 10,000 राहुरी (21 जून 2025) : निलंबित असलेल्या ग्रामसेवकाचा दोषारोप अहवाल पाठवण्यासाठी तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना राहुरी गटविकास अधिकार्‍यांना अहिल्यानगर एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या कारवाईनंतर लाचखोर पुरते हादरले आहेत. सुधाकर श्रीरंग मुंडे (57, प्लॉट नंबर 68, 69 केशव कुंज रोड श्रीराम चौक ऐश्वर्या नगरी, अहिल्यानगर) असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
58 वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून जि.प.अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निलंबनाची कारवाई केली व त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता अधिकार्‍यांनी 20 जून रोजी दहा हजारांची लाच स्वतःच मागणी करीत लाच स्वीकारली.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई नाशिक पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपूटे, पोलिस निरीक्षक छाया देवरे, पोलिस नाईक चंद्रकांत काळे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, ड्रायव्हर अरुण शेख आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !