मंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकाराला यश : मेस्को कामगारांना यापुढे ‘समान काम समान वेतन मिळणार’ !


MESCO workers will henceforth get ‘equal pay for equal work’! भुसावळ (21 जून 2025) : दीपनगर येथील मेस्कोच्या सुरक्षा विभागात कार्यरत माजी सैनिकांची समान कामासाठी समान वेतन आणि सेवानिवृत्ती वयातील तफावत दूर करण्याची मागणी होती व या संदर्भात त्यांचा लढा सुरू होता. मंत्री संजय सावकारे यांनी या मागण्यांची दखल घेत माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत समान कामाचा समान मोबदला या तत्वानुसार मेस्को प्रशासनाने नवीन वेतन प्रस्ताव तयार करून तत्काळ मंजुरीसाठी पाठवावा तसेच सेवानिवृत्ती वयात एकरूपता आणून 58, 60 व 65 अशा गोंधळात टाकणार्‍या नियमांऐवजी एकसंध व स्पष्ट धोरण लागू करावे, जे माजी सैनिकांच्या हिताचे ठरेल याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती हिरा मारुती, फुलगाव येथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) च्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री सावकारे यांनी दिली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मुरलीधर उर्फ गोलू पाटील व पत्रकार राजेश निकम यांची उपस्थिती होती.

लढ्याला आले यश
मंत्री संजय सावकारे यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती यावेळी दिली. ते म्हणाले की, आपल्या सर्व मागण्या आता मान्य झाल्या असून हा विजय तुमच्या एकतेचा आणि संयमाचा आहे, असे सांगून त्यांनी उपस्थित मेस्को कामगारांचे अभिनंदन केले.

यांची मेळाव्याला उपस्थिती
या भावनिक आणि उत्साही सोहळ्यास मेस्को सुरक्षा विभागातील अधिकारी वर्ग, प्रमुख कामगार नेते अरुण दामोदर, भरत पाटील, जितेंद्र वराडे, पत्रकार राजेश निकम यांची उपस्थिती होती. संघटनेचे अध्यक्ष नितीन अडकमोल, सचिव सुनील महाजन, संघटक राजेश लोंढे, हितेश महाजन, गजानन चौधरी, किशोर सोनार, भूषण दुसाने, कोषाध्यक्ष गणेश चौधरी, महेश बावस्कर, व्ही एन कोलते यांच्यासह अनेक पदाधिकारी, पर्यवेक्षक व महिला सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !