गुलाबराव पाटील यांचे मोठे विधान : सर्वात आधी संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव दिला !
Gulabrao Patil’s big statement: Sanjay Raut was the first to propose a Shiv Sena hijack! मुंबई (22 जून 2025) : शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत हेच फुटणार होते, असे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते, शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता मात्र ते त्यावेळेस थांबले, संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
शनिवारी शहाजी बापू पाटील यांनी देखील संजय राऊत यांच्याबाबत असंच वक्तव्य केलं होतं. संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं, पण त्यांना आमदारांचा विरोध होता. त्यांना 30 ते 35 आमदारांचा विरोध होत म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. आजही उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य आहे त्यामुळे लवकरच राजकीय घडामोडी घडतील, असा दावा देखील शहाजी बापू पाटील यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी देखील राऊत यांच्याबद्दल असाच दावा केला आहे. संजय राऊत हे सर्वात पहिले फुटणार होते, असं त्यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.




