आपले विचार चांगले ठेवा म्हणजे कार्यदेखील चांगले होईल : प.पू.जनार्दन हरीजी महाराज

भुसावळात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे भुसावळ प्राईड सन्मान


Keep your thoughts good and your work will also be good: H.E. Janardan Hariji Maharaj भुसावळ (23 जून 2025) : आपले विचार चांगले ठेवा म्हणजे आपले कृत्य चांगले होईल. असे सत्कृत्य करणार्‍यांचा आज सत्कार येथे झालेला आहे यातून आपण बोध घेतला पाहिजे. देवाकडे याचना करू नका तर त्यासोबत आपले प्रयत्न सुद्धा सुरू ठेवा म्हणजे आपल्याला यश नक्कीच मिळेल, असा आशावाद महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी येथे व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे ‘भुसावळ प्राईड’ या कार्यक्रम
ात ते बोलत होते.

विविध मान्यवरांचा सत्कार
या कार्यक्रमात सुरुवातीला भुसावळ शहरांत गत वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पारंपरिक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर भुसावळ मध्ये मध्यंतरीच्या काळात रोटरी रेल सिटीने ने गुड टच बॅड टच या विषयावरती सुमारे 30 हजार विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षण दिले होते, हे शिक्षण भुसावळ मधील सर्व स्त्री रोग तज्ञांनी विनामूल्य दिलेले होते. अशा सर्व स्त्री रोग तज्ज्ञांचा सत्कार सुद्धा महाराजांच्या हस्ते करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा पारिवारिक सत्कार सुद्धा महाराजांच्या हस्ते करण्यात आला.

यांचा झाला सन्मान
शहरातील लिलाई हॉलमध्ये मोफत दवाखाना चालवणार्‍या डॉ. अविनाश विठ्ठल पाटील उर्फ बाळू डॉक्टर यांचा सन्मान करण्यात आला. भोरगाव लेवा पंचायतीत सलग चौदा वर्ष सचिव असताना अनेक
82 जोडप्यांमध्ये त्यांनी मनोमिलन घडवले. गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा, भुसावळ या संस्थेने गत अनेक वर्षांमध्ये विनामूल्य अन्नदानाचे लंगर चालवण्याचे काम केले असून शहरातील हद्दीवाली व आगीवाली चाळ भागातील अतिक्रमण उठल्यानंतर दहा हजार निर्वासित व्यक्तींना जेवण पुरवण्याचे काम या संस्थेने केले शिवाय या संस्थेद्वारे आर्थो बँक फुकट चालवली जाते. तिसरे सन्मानाथी अजय रामदास आंबेकर हे एलआयसीमध्ये हेड क्लर्क असून त्यांनी 2023 सालच्या सातारा मॅरेथॉनमध्ये एका अनोळखी धावपटूला धावताना हार्ट अटॅक येत असताना आपली स्वतःची मॅरेथॉन सोडून त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत केल्याने त्यांना गौरवण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर परमपूज्य जनार्दन हरी महाराज, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रजनी सावकारे, रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सेक्रेटरी अनिल सहानी व प्रोजेक्ट चेअरमन सोनू मांडे आदींची उपस्थिती होती.

गणपती उत्सवाचे पुरस्कारार्थी असे
पंकज शांताराम नेवे, सुषमा महेश भारंबे, भाग्यश्री रोशन पालक तसेच गुड टच बॅड टच या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉ.मनीषा दावलभक्त, डॉ.वृषाली चौधरी, डॉ.चेतन ढाके, डॉ.नीलिमा नेहते, डॉ. नितीन पाटील, डॉ.अर्चना खानापूरकर, डॉ.सुवर्णा गाडेकर, डॉ.दीपाली गोठवाल, डॉ.दीप्ती चौधरी, डॉ.दीपा रत्नानी यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन सुयश न्याती तर प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.राहुल पांडे तर आभार देवा वाणी यांनी मानले. 200 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !