सक्तीच्या हिंदीला विरोध दर्शविण्यासाठी भुसावळात मनसेने दिले मुख्याध्यापकांना निवेदन

MNS submits memorandum to principals in Bhusawal to protest against compulsory Hindi भुसावळ (24 जून 2025) : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सक्तीच्या हिंदीला विरोध करण्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देण्याची मोहिम राबवली आहे. या अनुषंगाने भुसावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील विविध शाळांमध्ये जावून मुख्याध्यापकांना पत्र देवून सक्तीच्या हिंदीला विरोध दर्शविण्याचे आवाहन केले. मराठी व इंग्रजी भाषेची भुसावळ शहर व भुसावळ तालुका येथील इंग्रजी, मराठी, हिंदी, या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना पक्षाच्या आदेशा नुसार अंमलबजावणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ तालुकाध्यक्ष तुषार वाढे, भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शहर सचिव मंगेश भावे, शहर उपाध्यक्ष हरीश लोखंडे, दक्षिण विभाग अध्यक्ष शिवम गायकवाड आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.