सीईटी परीक्षेत भुसावळातील अथर्व साखरेचे घवघवीत यश


भुसावळ (24 जून 2025) : भुसावळ शहरातील ज्ञानज्योती विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व संजय साखरे याने सीईटी परीक्षेत 99.62 परसेंटाइल्स मिळवून उल्लेखनीय रँक मिळवली. जेईई या परीक्षेत 97.55 पर्सेंटाईल मिळाले. त्याला दहावीच्या परीक्षेमध्ये सेंट अलॉयसीस स्कूलमध्ये 92 टक्के व बारावी विज्ञान शाखेतही त्याने 86.8 गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक मिळविला होता.

अथर्वच्या या यशामागे त्याची मेहनत व जिद्द, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, व पालकांचे पाठबळ ही त्रीसूत्री कारणीभूत आहे. अथर्व हा जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर खडके येथील मुख्याध्यापक संजय साखरे व सोनल साखरे यांचा मुलगा आहे. भुसावळ येथील दिगंबर जैन मंदिराचे ट्रस्टी बोर्डचे चेअरमन सतीश साखरे व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे यांचा पुतण्या आहै. त्याचे शाळेतून, कुटुंबातून समाजातून, व सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !