नवोदय परीक्षेत रोनित पाटीलचे यश

भुसावळ (24 जून 2025) : साकेगाव येथील मूळ रहिवासी व भडगावस्थित डॉ. हेमंत व डॉ.प्रणिता पाटील यांचे चिरंजीव रोनित पाटील याने केंद्रीय विद्यालय अंतर्गत घेण्यात येणार्या नवोदय परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत असलेल्या रोनित हेमंत पाटील याने इयत्ता पाचवीत असताना नवोदयची परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये त्याने घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.