दीपनगरातील पर्यावरणीय समस्यांचे लवकरच निराकरण : जिल्हाधिकार्यांनी घेतली बैठक

जळगाव (25 जून 2025) : औष्णिक विद्युत प्रकल्प दीपनगरातील पर्यावरणीय समस्या प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासंदर्भात अनेक तक्रारी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केल्या होत्या मात्र प्रकल्पकर्त्यांकडून समस्या सुटत नपसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथर्टीने तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकार्यांनी कमिटी स्थापन करून प्रकल्प संचालक लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली 3 जून व 13 जून कमिटीने पूर्ण परिसरामध्ये पाहणी केली सरपंच व गावकर्यांची चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
प्रामुख्याने वेल्हाळे गावांमध्ये सर्वात जास्त समस्या आहेत. अॅश बंड परिसरामध्ये नेहमीच पाईपलाईनद्वारे राख पसरत असल्याने प्रदूषण निर्माण होत आहे. शिवाय वेल्हाळे भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले असून वेल्हाळे नागरिकांनी पिण्यासाठी शुद्ध पाणी पिण्याची मागणी केली आहे . तक्रारीमधील सर्वच बाबी सत्य आढळल्या. 660 प्रकल्पामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिचार्ज पिट, 38 हेक्टर वृक्षारोपण व 2/500 प्रकल्पामध्ये शंभर एकर वृक्षारोपण करणे बाकी असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य अभियंता मोराळे या समस्यांच्या सर्वच बाबी टप्प्या-टप्प्याने गतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तापी नदीमध्ये होणारे प्रदूषण त्यांनी ताबडतोब उपाय योजना करून बांध बांधण्यासाठी कार्यरत केले आहे. नदीत नाल्यामध्ये साचलेली राख पूर्ण काढण्याची कबुली दिलेली आहे. बुधवार, 25 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी यांनी सर्व कमिटीचे सदस्य तक्रारदार यांच्या समस्या जाणून घेऊन अहवाल सादर करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. प्रकल्प करताना अनेक कामे पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी मोरे यांनी सूचना केल्या.
वनविभागाचे बिराजदार यांनी परिसरामध्ये राख पसरल्याचे मान्य करून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्यांनी वेळोवेळी प्रकल्पाला केलेला दंड केलेल्या कार्यवाही त्यांचे रिपोर्ट व तक्रारदाराने मांडलेल्या समस्या उपाय योजना सोडवण्यासाठी मान्य करून प्रकल्प अधिकारी तत्पर असल्याचे म्हणाले.
138 एकर झाड लावणेचे नियोजन निरी कंपनीला पाच वर्षांसाठी देऊन परिपूर्ण झाडे जगवण्याची हमी घेणार आहे. वृक्षारोपण प्रकल्पाच्या प्रभावित गावाच्या व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी न लावता वेल्हाळा अश बंड व इतरत्र गावांना प्राधान्य देण्यात यावे या सर्व समस्यांचे निराकरण तक्रारीपेक्षा महत्त्वाचे आहे. नेत्यांनी केंद्रातून व राज्यातून आठशे मेगावॅट व इतरत्र प्रकल्प मंजूर करून आणावे आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करावा, अशी भावना आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी मोरे, वनविभागाचे बिराजदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजपूतख बीटीपीएस प्रकल्प अधिकारी राजेश मोराळे, राजेंद्र चौधरी. वेल्हाळा गावचे योगेश पाटील, विजय पाटील मन्यारखेडा सरपंच अजय इंगळे, सुधाकर चौधरी, अभिमान शिरसाट, मयूर शेळके आदींची उपस्थिती होती.
