पोलिस अंमलदाराने आधी मुलीचा आवळला गळा नंतर स्वतःलाही संपवले

Police officer first strangled the girl and then killed himself नाशिक (25 जून 2025) : कौटुंबिक कलहातून घटस्फोट झालेल्या अंमलदाराने सहा वर्षीय पोटच्या गोळ्याचा आधी गळा घोटला व नंतर स्वतःदेखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली.
पोलिस अंमलदार स्वप्नील गायकवाड (34, रा.मॉडेल कॉलनी, नाशिकरोड) यांनी स्वत:च्या सहा वर्षीय बालिकेचा गळा आवळला व नंतर स्वत:ही गळफास घेतला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

नाशिक शहरातील पुणे महामार्गावर उपनगर पोलिस ठाण्यात अंमलदार गायकवाड यांची नेमणूक होती. 2014 साली ते पोलिस दलात दाखल झाले होते. त्यांनी त्यांची चिमुकली भैरवी गायकवाडचा गळा दाबून खुन केला. यानंतर स्वत:ही गळफास घेतला. या घटनेने संपुर्ण शहर पोलिस दलासह परिसरात खळबळ उडाली.. गायकवाड दाम्पत्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता, अशी चर्चा परिसरात आहे. या कलहातून त्यांचा घटस्फोट झाला होता.
गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. गायकवाड याने अशाप्रकारे इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास आता उपनगर पोलिसांनी सुरू केला आहे.
