खाकीतील शिलेदारांच्या चमकदार कामगिरीची दखल : भुसावळ पोलिस उपअधीक्षकांनी ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरवले


Recognition of the brilliant performance of the khaki-clad Shiledars: Bhusawal Deputy Superintendent of Police honored them with the ‘Top Cop of the Month’ award भुसावळ (25 जून 2025) : कर्तव्याप्रती सचोटी व अधिक इमाने ईतबारे आपले काम करून पोलिस दलाचा नावलौकीक वाढवणार्‍या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी भुसावळ उपविभाग अंतर्गत ‘पोलिस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ’ ही अभिनव संकल्पना पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सुरू केली आहे. या संकल्पना अंतर्गत मे 2025 साठी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पाच पोलिस अंमलदारांना मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत सन्मानित करण्यात आले.

कर्मचार्‍यांमध्ये कामाप्रती वाढला उत्साह
पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पोलिस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या पोलिस अंमलदारांचे कौतुक व्हावे, त्यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी आणि दैनंदिन कामकाजात उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळावी, हा यामागे मुख्य उद्देश आहे. मे 2025 महिन्यासाठी निवड झालेल्या अंमलदारांची नावे उपविभागातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांनी निश्चित केली. निवड झालेल्या अंमलदारांना उपविभागीय गुन्हे आढावा बैठकीत पुष्पगुच्छ आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच प्रत्येक अंमलदाराला एक हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळण्याबाबत पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अंमलदारांचे नाव आणि फोटो ‘पोलिस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ’ या शीर्षकाखाली संबंधित पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागावर लावले जातात. उपविभागातील सर्व ‘पोलिस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ’ मानकार्‍यांचा एकत्रित फोटो उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील दर्शनी भागात लावण्यात येत असल्याने कर्मचार्‍यांचा उत्साह वाढला आहे.









यांची होती उपस्थिती
गुन्हे आढावा बैठकीला शहरचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, तालुक्याचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, सहा.निरीक्षक निलेश देशमुख, नशिराबादचे सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांच्यासह उपविभागातील सर्व दुय्यम अधिकारी आणि 60 पोलिस अंमलदार उपस्थित होते.

दोष सिद्धीचे प्रमाण वाढणार
पुरस्काराच्या या संकल्पनेमुळे पोलिस अंमलदार नागरिकांना सौजन्याची वागणूक देतील, पोलिस दलाची जनमानसातील प्रतिमा उंचावेल, पीडित व्यक्तींची वेळीच दखल घेतली जाईल, दाखल गुन्ह्यांचा कौशल्याने तपास केला जाईल, प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढतील, दोषसिद्धीचे प्रमाण वाढेल, आणि जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येतील,असे प्रतिपादन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांना उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्या समोर केले.

गौरविण्यात आलेले कर्मचारी असे
मे-2025 महिन्यासाठी ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ म्हणून गौरवण्यात आलेले पोलीस अंमलदार आणि त्यांची कामगिरी अशी शहर पोलिस ठाण्यातील राहुल नारायण भोई, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील जितेंद्र पाटील, तालुका पोलिस ठाण्यातील महिला पोलिस मधुकर लोखंडे, नशिराबाद येथील जगन्नाथ पाटील, शहर वाहतूक शाखेतील जगदीश खर्चाने यांचा गौरव करण्यात आला.

उत्कृष्ठ काम करणार्‍यांचा गौरव
भुसावळ विभागातील उत्कृष्ठ काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा प्रशासनातर्फे गौरव केला जातो. गौरवामुळे अन्य कर्मचार्‍यांना सुध्दा प्रेरणा मिळते व पोलिस कर्मचार्‍यांमध्ये कामाप्रती अधिक उत्साह वाढल्याची भावना भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !