पाचोऱ्यातील डॉ.स्नेहल रावते यांचा अपघाती मृत्यू : चालकाला अटक

Accidental death of Dr. Snehal Raote in Pachoray: Driver arrested जामनेर (26 जून 2025) : पाचोर्यातील रहिवासी असलेल्या विवाहिता व डॉ.स्नेहल रावते यांचा अपघातात 16 जून रोजी मृत्यू झाला हातेा. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत डंपर चालकाला अटक केली आहे.
फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने आरोपी निष्पन्न
गोंदेगावनजीक अपघाताची घटना घडल्यानंतर चालक वाहनासह पसार होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही पुरावा नसल्याने आरोपी व वाहन निष्पन्न करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शेंदुर्णीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे व त्यांच्या पथकाने सर्व बाजूने सलग तपास करून घटनेची सखोल माहिती घेतली. अनेक वाहनांची चौकशी केली. दरम्यान, या वेळेत 5 ते 6 वाहने पहूर ते शेंदुर्णी रस्ताने गेल्याचे तपासातून समजले. मात्र नेमके वाहन कोणते हा प्रश्न उनुत्तरीत होता. त्यामुळे तपासी अधिकारी नंदकुमार शिमरे यांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घटनास्थळावरील नमूने व टायर मार्क्स घेतले.

त्यानंतर संशयित सर्व वाहनांची तपासणी केली असता अपघात करणार्या वाहनाचा शोध लागला. अपघातातील डंपर (एम.एच. 19 ई.के.4102) हा धनराज मोरे (रा.टहाकाळी ता. जामनेर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले मात्र वाहन चालक व हेल्पर अपघात झाल्यापासून पसार होते. त्यांना सीडीआरद्वारे शोधून चालक संशयित आरोपी सुनील बिसन रेस्वाल (रा.रावळा, ता.सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर) याला 19 जून रोजी पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली तर दुसरा संशयित आरोपी हेल्पर सुरज यादव (रा. झारखंड) हा पसार आहे.
पहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे, गुलाब पवार, नरेश घाडगे यांनी ही कारवाई केली.
