भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समितीची सहविचार सभा

School Management Committee brainstorming session at K. Narkhede School, Bhusawal भुसावळ (26 जून 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार सभा उत्साहात झाली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल उपस्थित होत्या.
याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते अकरावीच्या प्रवेशाच्या संदर्भात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, विद्यालयातील के.एन.सी.टी.आय. संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, संगणक शिक्षिका सारीका भारंबे, विद्यालयातील शिक्षक सुहास चौधरी, प्रदीप सपकाळे यांचा अध्यक्षांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक एस.पी.पाठक यांनी केले.

या सहविचार सभेत अध्यक्षांकडून रोबोटिक्स लॅब, विविध स्पर्धा परीक्षा, विद्यालयातील शिस्त, विद्यार्थ्यांसाठी राबवण्याच्या विभिन्न स्पर्धा आणि उपक्रम अशा विविध विषयांवर उपस्थित शिक्षकांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. एस.एम.चिपळूणकर यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना याप्रसंगी सर्व शिक्षकांना दिल्या. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी केले. नितीन पाटील, शैलेंद्र वासकर, दिनकर हेलोडे, सुहास चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
