फायनान्स कंपनीला गंडा घालत दुचाकीची परस्पर विक्री : भुसावळातील दोघांसह तीन जणांना गुन्हे शाखेकडून अटक
Two-wheeler mutual sale by cheating finance company : Three people including two from Bhusawal arrested by Crime Branch जळगाव (26 जून 2025) : दुचाकी चोरी झाल्याचा बनाव करीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून फायनान्स कंपनीला गंडा घालणार्या भुसावळातील दोन संशयीतांसह तीन संशयीतांना जळगाव गुन्हेने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, चोरीची दुचाकी विकत घेणारा अशोक हिरामण मोरे (39, रा.दगडी मनवेल, ता.यावल), दुचाकी खरेदी-विक्री करणारा एजंट जफर शेख उस्मान (34, रा.रावेर, ह.मु.जाम मोहल्ला, भुसावळ), स्व-मालकीचे वाहन चोरीला गेल्याची तक्रार देणार्या प्रमोद निलेश कोळी (37, रा.हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयीतांसह दुचाकीचा ताबा भुसावळ शहर पोलिसांना देण्यात आला आहे.





गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना संशयित आरोपी अशोक हिरामण मोरे (रा.दगडी मनवेल, ता.यावल) याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. मोरे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील बजाज दुचाकी (एम.एच. 19 सी.सी.6640) बाबत चौकशी केल्यानंतर त्याने सुमारे पाच वर्षांपूर्वी रावेरातील जुन्या वाहन खरेदी-विक्रीचा एजंट जफर शेख उस्मान (ह.मु. जाम मोहल्ला, भुसावळ) याच्यामार्फत त्याने प्रमोद निलेश कोळी (रा.हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 डी.के.0755) 16 हजारांमध्ये विकत घेतली.
तिघांनी संगमताने रचला कट
या व्यवहारावेळी तिघांमध्ये एक रचण्यात आला. प्रमोद कोळी यांनी बजाज फायनान्सद्वारे दुचाकी घेतल्याने तिचे हप्त बाकी असल्याने त्यांनी पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे ठरवले. प्रमोद निलेश कोळी यांनी ठरल्याप्रमाणे 30 डिसेंबर 2019 रोजी दुचाकी चोरीची तक्रार दिल्यानंतर एजंट जफर शेख उस्मानने कमिशन म्हणून दोन हजार रुपये स्वीकारले. संशयित आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चोरीचा हा संपूर्ण बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेने कट रचार्या तिन्ही आरोपींना अटक केली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावीत, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रीतमकुमार पाटील, हवालदार यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने केली.
