जळगावात सॉ मिलसह प्लायवूड दुकानाला भीषण आग : 50 लाखांवर नुकसान


Massive fire breaks out at saw mill and plywood shop in Jalgaon : Losses exceed Rs 50 lakhs जळगाव (26 जून 2025) : जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील चंद्रिका सॉ मिल व प्लायवूडच्या दुकानाला गुरुवार, 26 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे स्पष्ट कारण कळू शकले नसलेतरी या आगीत सुमारे 50 लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

आगीमुळे उडाली खळबळ
जळगावच्या बेंडाळे चौकात असलेल्या चंद्रिका सॉ मिल आहे. गुरुवारी दुपारी 12.10 मिनिटांच्या सुमारास अचानक सॉ मिलमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडताच खळबळ उडाली. जोरदार मुसळधार पाऊस सुरू असतानाही आगीने रौद्ररूप घेतले. जळगाव अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही बंब बोलावण्यात आले.









सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत दहावर बंबांनी आग नियंत्रणात आणत असून पोलिस यंत्रणा दाखल झाली आहे. आगीचे नेमके कारण समोर आले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !