लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणार्या कार्यकर्त्यांचा भुसावळ भाजपच्या वतीने सत्कार
भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती

Bhusawal BJP felicitates activists fighting for democracy भुसावळ (26 जून 2025) : देशात आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भीडपणे रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांचा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भुसावळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
काँग्रेसचा केला निषेध
हा कार्यक्रम कॅबिनेट मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात लोकशाही धोक्यात असल्याचा खोटा बनाव करणार्या काँग्रेस पक्षाचा जोरदार निषेध करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सन्माननीय जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रदेश सचिव अजय भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भुसावळ उत्तर मंडळाध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण मंडळाध्यक्ष किरण कोलते, ग्रामीण पूर्व मंडळाध्यक्ष प्रशांत पाटील, पश्चिम मंडळाध्यक्ष गोलू पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, माजी जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, आतिश झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
दिलीप ओक, अरुण भावसार, नारायण रणधीर, प्रकाश मुळे, राजू खरारे, बिसन गोहर, अलका शेळके, स्नेहल अडावतकर, पुंडलिक पाटील, विनोद चांदवानी, सुरेश शर्मा, शंकर शेळके, शैलेजा पाटील, अशोक बाविस्कर आदींचा समावेश होता.
यांची होती उपस्थिती
यावेळी खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र नाटकर, निक्की बत्रा, बापू महाजन, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, भालचंद्र पाटील, अजय नागराणी, अॅड.बोधराज चौधरी, पवन बुंदेले, श्रेयस इंगळे, राहुल तायडे, अनिरुद्ध कुलकर्णी, धनराज बाविस्कर, प्रेमचंद तायडे, भावेश चौधरी, अनिल पाटील, प्रशांत नरवाडे, रवींद्र पाटील, गोपीसिंग राजपूत, योगेंद्र हरणे, गुणवंत बोरोले, साजीद शेख, अमोल पाटील, जयंत माहुरकर, चेतन सावकारे, सागर वाघोदे, अमित असोदेकर, सागर चौधरी, गौरव वाघ, वेदप्रकाश ओझा, हर्षा जोशी ,सागर जाधव यांसह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मोर्चा-आघाडीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आणीबाणी काळात कार्यकर्त्यांनी केलेला संघर्ष, त्याग व लोकशाहीवरील निष्ठेचे स्मरण करत उपस्थितांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सूत्रसंचालन राहुल तायडे तर आभार किरण कोलते यांनी मानले.
