चोपडा पोलिसांची मोठी कारवाई : दरोड्यापूर्वी पिंपरी-चिंचवड भागातील दरोडेखोर जाळ्यात


Chopra police take major action: Robbers from Pimpri-Chinchwad area caught in the net before the robbery चोपडा (27 जून 2025) : चोपडा शहर पोलिसांनी सतर्कतेने पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागातील दरोडेखोरांना गजाआड केले असून त्यामुळे मोठा दरोडा टळला आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) परिसरात विविध गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार चोपडा शहरात येऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना 25 जून 2025 रोजी रात्री पोलिस निरीक्षक मयूर माळी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पथकासह तत्काळ कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, वाहने, मोबाइल, तसेच गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.






ही टोळी पुणे परिसरात जबरी चोरी, घरफोडी, खून, मारामारी, ट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती. अटकेतील आरोपींमध्ये तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे (निगडी), विनोद राकेश पवार (चिंचवड) आव सुनील गोरख जाधव (चिंचवड) यांचा समावेश आहे तर आरोपींचे तीन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेण्यात आले आहेत.

अटकेतील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, एपीआय एकनाथ भिसे, दीपक विसावे, जितेंद्र सोनवणे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, लक्ष्मण शिंगाणे, हर्षल पाटील, महेंद्र साळुंखे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, गजेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !