भाजप आमदार लोणीकरांची जीभ घसरली : शेतकर्यांचा बाप काढत म्हणाले तुमचे कपडे, चप्पल आमच्यामुळेच

BJP MLA Lonikar’s tongue slipped : He mocked the farmers’ father and said that your clothes and slippers are because of us जालना (27 जून 2025) : भाजपाच्या वाचाळवीर आमदार बबनराव लोणीकर यांनी भाषणात थेट शेतकर्याचा बाप काढल्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. शेतकर्यांच्या मुलांच्या अंगावर कपडे आणि पायातले बूट हेसुद्धा माझ्यामुळेच असल्याचं सांगत आई, बहीण आणि बायकोविषयी मग्रुरीची भाषा त्यांनी वापरल्याचा प्रकार घडला आहे.
टीकेची झोड उठताच मुख्यमंत्र्यांनी टोचले कान
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, लाडक्या बहिणी, वृद्धांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजना कुठल्या पक्षासाठी नाही तर सर्वांसाठी असतात मात्र लोणीकरांनी माझ्यामुळे आणि मोदींमुळेच तुम्हाला योजनांचा लाभ मिळतो, असं म्हणत सरंजामशाही मानसिकता दाखवलीय.