नाशिक एसीबीच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी भारत तांगडे : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

नाशिक एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा घार्गे छत्रपती संभाजीनगरच्या उपायुक्तपदी : धुळ्याचे अपर अधीक्षक किशोर काळे यांची बदली


Bharat Tangde appointed as new Superintendent of Police of Nashik ACB भुसावळ (27 जून 2025) : भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी शुक्रवार, 27 रोजी काढले आहेत.

नाशिक एसीबीच्या अधीक्षकपदी भारत तांगडे
नाशिक एसीबीच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर यांची छत्रपती संभाजी नगरच्या पोलिस उपायुक्तीपदी बदली करण्यात आली आहे तर नाशिक एसीबीला आता ठाणे ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे बदलून येत आहेत.

धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांची नाशिक शहर पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूरचे अपर पोलिस अधीक्षक अजय लक्ष्मण देवरे बदलून येत आहेत.

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली.

नाशिक मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

राज्यभरात या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या

तेजस्वी सातपुते यांना पुण्यात नवी जबाबदारी
पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखेच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 या पदावर समादेशक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईत 5 नव्या डीसीपी नियुक्त
मुंबई पोलिस विभागात पाच आयपीएस अधिकार्‍यांची पोलीस उपायुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. यात कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील, विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचा समावेश आहे.

महेंद्र पंडित यांचीही उल्लेखनीय बदली
आतापर्यंत स्तंभ दोनमध्ये कार्यरत असलेले महेंद्र पंडित यांची बदली स्तंभ तीन अंतर्गत करण्यात आली असून त्यांना बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्त करण्यात आले.

पुण्यात तीन नवीन आयपीएस
पुण्यात तीन नवीन आयपीएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, तसेच परिमंडळ 2 च्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली करण्यात आली. स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे बदली झाली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !