चोपडा शहर पोलिसांची कामगिरी : बंदुकीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍याला बेड्या


Chopra City Police’s performance : Chains for those who created terror at gunpoint चोपडा (27 जून 2025) : चोपडा शहर पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवार, 26 जून रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाद्य आहे. कार्तिक रवींद्र पवार (21, रा.जुना पारधीवाडा, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा नगरपालिकेच्या पाठीमागील कब्रस्थानाजवळ एक इसम गावठी कट्टा लावून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळताच त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी चोपडा शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या संशयित तरुणाला ताब्यात अटक करीत त्याच्या कमरेला लावलेला 40 हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा जप्त केला.









यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, जितेंद्र सोनवणे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, हर्षल पाटील, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, प्रकाश मधुरे, प्रमोद पवार आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !