गोदावरी अभियांत्रिकीत स्टार्टअप्स प्रदर्शन विद्यार्थ्यांनी सादर केल्या भन्नाट कल्पना

जळगाव (28 जून 2025) : गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव, आयक्यूएसी आणि इन्स्टिट्युशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ऑडिटोरियममध्ये इनोवेशन आणि स्टार्टअप्स या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन झाले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी भन्नाट कल्पना सादर करीत 21 व्या शतकातील भारताची संकल्पना मांडली.
राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्टार्टअप संकल्पनांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन करण्यात आले आणि इनोव्हेशन अॅम्बेसेडर्स मार्फत थेट मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील(प्रेसिडेंट,आयआयसी), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता व व्हाईस प्रेसिडेंट आयआयसी), डॉ.अतुल बर्हाटे (समन्वयक,आयआयसी), सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग,विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अतुल बर्हाटे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. तर डॉ. हेमंत इंगळे यांनी विद्यार्थी आणि व्यावसायिक जीवनात स्टार्टअप्स व इनोवेशन चे महत्त्व अधोरेखित केले व नवीन संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले.यानंतर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना ङ्ग‘जगावर राज्य करणारे देश हे नेहमीच इनोवेशन मध्ये अग्रेसर असतात, म्हणूनच स्टार्टअप्स ही केवळ संकल्पना नसून भविष्याचा आधार आहेत.या कार्यक्रमाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सचे थेट प्रात्यक्षिक, उद्योगाशी थेट संवाद, आणि इनोव्हेशन अॅम्बेसेडर्सचे प्रत्यक्ष मार्गदर्शन यांचा समावेश होता.

यशस्वी आयोजनासाठी प्रा.स्वप्निल महाजन व प्रा.हरीश पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा रेश्मा अत्तरदे यांनी केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ.अनिकेत पाटील यांनी ऑनलाईन उपस्थीती देवून कौतुक केले.
