भुसावळातील डॉ.सांतनू कुमार साहू यांचा चित्रपट अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते हाँगकाँगमध्ये सन्मान
Dr. Santanu Kumar Sahu from Bhusawal honored in Hong Kong by film actor Sonu Sood भुसावळ (28 जून 2025) : भुसावळ शहर व विभागासह मध्यप्रदेशातील रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या गोल्डर अवर हॉस्पीटलचे डॉ.सांतनू कुमार साहू यांना चित्रपट अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते हाँगकाँगमध्ये नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
आरोग्य सेवेची ‘लोकमत’तर्फे दखल
महाराष्ट्राची ओळख असलेल्या ‘लोकमत’ वृत्तपत्रातर्फे भुसावळातील गोल्डर अवर हॉस्पीटलचे डॉ.सांतनू कुमार कुमार साहू यांना नुकतेच हाँगकाँगमधील शेरेटन तंग चुंग हॉटेलमधील आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समीट अॅण्ड अवॉर्डस् 2025’ ने चित्रपट अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते गौरवण्यात आले.
‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ध्येय उराशी बाळगून भुसावळात गोल्डन अवर हॉस्पीटलच्या माध्यमातून डॉ.सांतनू कुमार साहू यांनी 24 तास अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून 12 हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी केली आहे शिवाय चार हजारांहून अधिक यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
अशा आहेत हॉस्पीटलमध्ये सुविधा
भुसावळातील जामनेर रोडवरील आनंद नगरातील ज्ञानरंजन टॉवरमध्ये गोल्डन अवर हॉस्पिटल 24 तास कार्यरत आहे. मल्टि सुपर स्पेशालिटी क्रिटीकल केअर युनिट हॉस्पीटलमध्ये अत्याधूनिक सुविधेसह डायलीसीस युनिट आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या सहकार्याने ऑपरेशन सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी रुग्णालयाच्या भ्रमणध्वनी 77739-44435 वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.




