कलागुणांचा विकास झाल्यास जीवन समृद्ध अन् अर्थपूर्ण होते : आरती चौधरी
भुसावळात महिला क्रीडा मंडळातर्फे मेहंदी स्पर्धा : 47 स्पर्धकांचा सहभाग

Mehndi competition organized by Women’s Sports Board in Bhusawal : 47 contestants participated भुसावळ (28 जून 2025) : महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महिला मंडळ भुसावळतर्फे राममंदिर सभागृहात मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या. 47 स्पर्धकांनी यशस्वीपणे सहभाग नोंदवला. सहभाग घेणार्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ‘ब्राईडल मेहंदी’ साठी वेळ अर्धा तास देण्यात आला होता. अपेक्षा जैन नावाची दिव्यांग मुलीने जळगावातून येत उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले..
स्पर्धेच्या सुरवातीला सचिव लता होसकोटे यांनी स्पर्धेचे नियम सांगितले. सूत्रसंचलन जयश्री ओक यांनी केले. श्रृती ओक परीक्षक होत्या. मनिषा पाटील, चेतना खडसे, वैशाली अनंत पाटील या तीन नविन सदस्यांना महिला क्रीडा मंडळात प्रवेश दिल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.

अपुलकीचा प्रेमाचा रंग कायम टीकणारा : आरती चौधरी
महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी म्हणाल्या की, महिला क्रीडा मंडळ सातत्याने महिलांच्या कलागुणांच्या विकासासाठी झटत असते व महिलांमधे आत्मविश्वास निर्माण करून अर्थार्जनासाठी उद्युक्त केले जाते. मेहंदीचा रंग हा अल्पकाळासाठी आहे पण महिला क्रिडा मंडळाचा आपुलकीचा प्रेमाचा रंग कायम टीकणारा असल्याचे त्या म्हणाल्या.
असे आहे यशस्वी स्पर्धक
प्रथम- तेजस्विनी वाणी, द्वितीय- पूजा किशोर भोई, तृतीय- अंकिता नरवाडे, उत्तेजनार्थ- प्रज्ञा पाटील, उत्तेजनार्थ- धनश्री कासार (नशिराबाद) तसेच उत्तम सादरीकरणासाठी चारूल भंगाळे, पूजा तायडे, दामिनी वाणी, महेक बानो खान, श्वेता कामरानी, रुकसार शेख, भाग्यश्री मोरे, मेघा माळी, अपेक्षा जैन, दीपमाला रील यांचा भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. प्रोजेक्टचेअरमन कावेरी चौधरी यांनी मंडळातर्फे आभार मानले. स्वाती भोळे यांनी या स्पर्धांसाठी परीश्रम घेतले. प्रसंगी मंडळाच्या सदस्या प्रभा पाटील, विनीता नेवे, प्राची राणे, मंगला पाटील, चारू पाटील, अनिता कवडीवाले, भारती चव्हाण, वैशाली पाटील, विजया निकम,साधना सराफ सराफ, संगीता पाटील आदींसह आमंत्रित पाहुण्या मेघा कुरकुरे, मंगला कोलते, मनिषा निकम, योगी ता पाटील व ज्योती पाटील ह्यांची विशेष उपस्थिती होती.