रिक्षा चालकांनी गणवेश न घातल्यास व नियम मोडल्यास थेट गुन्हा : सहा.निरीक्षक उमेश महाले

It is a direct crime if rickshaw drivers do not wear uniform and break the rules: Sixth Inspector Umesh Mahale भुसावळ (28 जून 2025) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालक व शाळा-महाविद्यालय प्रशासनासाठी शहर वाहतूक शाखेने कडक सूचना
दिल्या आहेत, नाहाटा महाविद्यालयात झालेल्या बैठकीत रिक्षा चालक, शाळा व महाविद्यालय प्रतिनिधी उपस्थित होते. नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस शहर वाहतूक शाखा, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन व शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी तसेच 70-75 शिक्षक, वाहन चालक व भुसावळ शिक्षण विभाग प्रमुख राहुल पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
वाहतुकीचे नियम पाळा
ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य, स्पीड लिमिटचे पालन आवश्यक शाळेजवळ हॉर्न वाजवू नये, ओव्हरलोडिंग थांबवा, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेणे गुन्हा, फ्रंट शीट बसवले तरी कारवाई अटळ, प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव रेकॉर्ड ठेवा, वाहन तपासणी व गणवेश अनिवार्य आहे, ब्रेक, इंडिकेटर तपासणी बंधनकारक आहे, वाहनात प्रथमोपचार पेटी ठेवणे गरजेचे असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.,
वाहतूक शाखेचा इशारा
विद्यार्थ्यांना फ्रंटशीट म्हणून बसवू नयेत, महामार्ग क्रॉस करून कोणी वाहनात चढताना आढळल्यास अशा वाहनचालकांविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, रिक्षा चालकांनी देखील गणवेश परिधान केलेला नसेल तर त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाईल. कोणाचीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भुसावळातील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांनी दिला.