भुसावळातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते चेतन जैन यांचा सन्मान

Chetan Jain, an entrepreneur and social activist from Bhusawal, was honored. भुसावळ (28 जून 2025) : क्रांतीसूर्य शूरवीर महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती, भुसावळ व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील यशस्वी उद्योजकांचा गुणगौरव सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात उद्योजकता क्षेत्रातील भुसावळ शहरातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते चेतन जैन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना भारतच्या राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष शीला सुखदेवसिंह गोगामेडी यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, श्री परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन जी महाराज (फैजपूर), योगेंद्रसिंह कटार व राजपूत समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.