यावल शहरात कंटेनरच्या धडकेत महिला ठार

हातगाडीसह रस्त्यात दुकान लावणार्‍यांवर पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल करणार : पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे


Woman killed in container collision in Yaval city यावल (28 जून 2025) : शहरातील बुरूज चौकाजवळ शुक्रवारी कंटेनरच्या धडकेत 58 वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकलेश्वर-बर्‍हाणपूर या राज्य मार्गाच्या कडेला भरत असलेल्या बाजार तसेच रस्त्यात विविध व्यवसाय करणार्‍या हातगाडी धारकांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून हा अपघात घडल्याने शहरातून संताप व्यक्त होत आहे. यापुढे प्रत्येक बाजाराच्या दिवशी हातगाडी सह रस्त्यात दुकान लावणार्‍यांवर यावल पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.

काय घडले यावल शहरात
यावल शहरातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गस्थ होतो. या राज्य मार्गाच्या कडेला शुक्रवारचा आठवडे बाजार भरतो. रस्त्याच्या कडेला व्यवसायीकांची दुकान तर रस्त्यावर हातगाडीवाले यामुळे रहदारीस प्रचंड अडचण निर्माण होते. शुक्रवारी सायंकाळी आठवडे बाजारात बुरुज चौकात कस्तुरबा चैत्राम सावकारे (58, रा.चुंचाळेम या महिला बाजारात जात असतांना या महिलेला कंटेनर (क्रमांक आर. जे. 09 जी. डी. 4970) वरील चालक आबिद खान नवाब खान याने धडक दिली. या धडकेत महिलेच्या डाव्या पायावरूनच थेट कंटेनरचे चाक गेले आणि महिलेचा पूर्ण एक पायच निकामी होऊन महिला गंभीर जखमी झाली. तर या महिलेचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडे बाजाराच्या अतिक्रमणामुळेच महिलेचा बळी गेल्याने शहरातून संताप व्यक्त केला जात आहेे.मयत महिलेवर शोकाकुल वातावरणात चुंचाळे गावात अंतसंस्कार करण्यात आले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !