धक्कादायक : सुटीवर आलेल्या महिला आयपीएस अधिकार्‍यांचे नाशिकमध्ये निधन


Female IPS officer on leave dies in Nashik नाशिक (29 जून 2025) : हरियाणात एसीबी पोलिस अधीक्षक असलेल्या स्मिती चौधरी (48) यांचे नाशिकमध्ये निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्या नाशिकमध्ये आल्यानंतर ही घटना घडली. सप्टेंबर 2023 पासून त्या पदावर कार्यतर होत्या. स्मिती चौधरी यांचे पती राजेश कुमार हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

स्मिती या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे पती राजेश कुमार हे सध्या नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक आहेत. 1998 मध्ये स्मिती यांचा राजेश कुमार यांच्यासोबत विवाह झाला. स्मिती या माजी आयएएस अधिकारी जयवंती शेओकंद यांच्या कन्या होत. नाशिकमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असता स्मिती यांचे निधन झाले.









स्मिती चौधरी 2004 मध्ये पोलीस विभागात डीएसपी म्हणून रुजू झाल्या होत्या. पंचकुला येथेही डीएसपी म्हणून काम केले. यासोबतच त्यांनी विविध जिल्ह्यांत काम केले आहे. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील डुमराखान कलान गावात त्यांचा जन्म झाला. 31 ऑगस्ट 2036 रोजी निवृत्त होणार होत्या. त्यांचे आजोबा चौधरी बसंत सिंग श्योकंद यांच्या कुटुंबात 11 हून अधिक सदस्य आयएएस, आयपीएस, कर्नल आणि इतर उच्च पदांवर होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !