भुसावळातील प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी ‘समाज शिरोमणी पुरस्कार 2025’ ने सन्मानीत

Prof. Dr. D.M. Lalwani भुसावळ (29 जून 2025) : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना वर्ल्ड सेवन वंडर रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने 22 व्या अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनात ‘समाज शिरोमणी पुरस्कार 2025’ ने सन्मानीत करण्यात आले.
सामाजिक कार्याची दखल घेत गौरव
मुंबई येथील भारतरत्न लता मंगेशकर आँडोटोरीयम, मिरा रोड येथे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार समारंभात प्रा.ललवाणी यांचा सन्मान कर्यात आला. प्रा.ललवाणी यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्याबद्यल त्याचप्रमाणे अनेक संस्थांना आर्थिक मदत, शैक्षणिक मदत त्यांनी केली आहे. अनेक संस्थावर त्यांनी विवीध पदे भूषवली असून त्यांनी आपल्या शिक्षक सेवेत सुध्दा भरीव कार्य केले आहे. ते गोसेवा सुद्धा करीत आहे. त्यांच्या अशा या सर्व समावेशक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

या मान्यवरांच्या हस्ते गौरव
हाा पुरस्कार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज व गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार कुणालजी मालुसरे यांच्याहस्ते तसेच मिसेस उत्तराखंड डॉ.रूपाली वशिष्ठ (डेहराडून), ज्यांच्या नावावर 881 पेटंट आहे नेक्स्ट जनरेशन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी.के.सरकार, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य आचार्य प्रणवकुमार शास्त्री, राष्ट्रपती पदक विजेता, आंतराष्ट्रीय सरोदवादक पंडीत ब्रीज नारायण, सहकार महर्षी भगवानराव पाटील (लातूर), डॉ.गुरतेज ब्रार (कॅनडा), सुरींदर कुमार सोलन (हिमाचल), डॉ.पंढरीनाथ रोकडे, डॉ.बा.आं.म.विद्यापिठ व संयोजक व फौंडर आरटिबीआर अॅड डॉ.क्रांती महाजन यांच्या उपस्थितीत देण्यात आला. प्रास्ताविक अॅड.क्रांती महाजन यांनी केले.
दरम्यान, प्रा.डॉ.ललवाणी यांच्या सुपुत्राच्या वाढदिवशीच त्यांना गौरविण्यात आल्याने हा दुग्धशर्करा योग झाला. ललवाणी यांनी या पुरस्काराबद्यल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व परीवार गण, आप्तेष्ट, मित्रपरीवार व सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.