अंजाळेतील जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखीचा मृत्यू

यावल पोलिसांनी केले ओळख पटवण्याचे आवाहन


यावल (29 जून 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे या गावात जखमी अवस्थेत एक अनोळखी सुमारे 40 वर्षीय इसम हा सोमवारी आढळून आला होता. त्याला गंभीर जखमी अवस्थेत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

अंजाळे, ता.यावल या गावातील आनंदा नारायण बिर्‍हाडे यांच्या राहत्या घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये एक अनोळखी सुमारे 50 वर्षीय इसम हा जखमी अवस्थेत पडून होता. याची माहिती नागरिकांनी यावल पोलिसांना दिली. यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पथकासह गावात दाखल झाले. जखमी अवस्थेतील या इसमाला त्यांनी तातडीने उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला.









याबाबत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सीएमओ डॉ. अमोल पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !